नवी दिल्ली । भारतीय निवडणूक आयोगाने पारदर्शकता वाढविण्यासाठी पोस्टल मतपत्रिका मोजण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने ३० मोठे बदल केलेत. यातील यादीबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय.
पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम आता उघडता येणार नाहीत. असा आदेश निवडणूक आयोगाने आपल्या नव्या नियमातून दिलाय. आतापर्यंत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली नसली तरी EVM उघडून त्याच्या मोजणीला सकाळी ८:३० वाजता सुरूवात केली जात असत.
पण आता यातपूर्णपणे बदल करण्यात येणार आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच EVM उघडल्या जाणार आहेत. जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जास्त पोस्टल मतपत्रिका असतील तर त्यांच्यासाठी अधिक टेबले लावली जातील. जर काही समस्या उद्भवल्या तर त्याची जबाबदारी तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची असे, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.















Discussion about this post