राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. आरक्षणासाठी अनेकांनी जीवाची आहुती दिली. अशीच एक घटना आता परभणीमधून समोर आलीय. ज्यात ओबीसी आरक्षणासाठी एका २२ वर्षीय तरुणाने शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ‘ओबीसी आरक्षण गेलं, माझी मनस्थिती बरोबर राहिली नाही.’, असं म्हणत या तरुणाने शेतामध्ये जाऊन आयुष्य संपवलं. कुमार नारायण आघाव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथे कुमार नारायण आघाव आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता.या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्याच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली.
त्यामध्ये ‘ओबीसी आरक्षण गेलं असं मी समाजापासून ऐकत आलो होतो. त्यामुळे माझी मनस्थिती बरोबर राहिली नव्हती. माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू होता. आमच्या तरुण बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी माझ्या ओबीसी समाजासाठी माझे जीवन संपवून टाकतो.’ असं लिहिले होते. एकुलता एक मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी जिंतूरच्या बोरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. कुमार आघाव हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला ४ बहिणी आहेत. त्याच्या मृत्यूमुळे आघाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या कुटुंबियाना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.















Discussion about this post