बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड सिंध बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. क्रेडिट मॅनेजर आणि अॅग्रीकल्चर मॅनेजर पदासाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट punjabandsind.bank.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे.
या भरती मोहिमेत १९० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यातील १३९ पद हे क्रेडिट मॅनेजर पदासाठी आहेत. ६० पदे ही अॅग्रीकल्चर मॅनेजर पदासाठी आहेत.या नोकरीसाठी इच्छुकांनी पात्रतेनुसार अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी CA, CMA, CFA आणि MBA (Finance) केलेले उमेदवार अर्ज कर शकतात. अॅग्रीकल्चर पदासाठी कृषी, डेअरी, पशुचिकित्सा, मत्स्य पालन अशा विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये भरायचे आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहेत.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचआरए, एलटीसी अशा अनेक सुविधा मिळणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला punjabandsind.bank.in वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर भरती सेक्शनमधील फॉर्मवर क्लिक करा. यानंतर माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.फॉर्म सबमिट करुन प्रिंट काढून घ्या.















Discussion about this post