भावी शिक्षकांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मोठी पदभरती होणार आहे. राज्यातील उच्च महाविद्यालयांमध्ये साडेपाच हजार पदांसाठी तर विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांसाठी भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही भरती होणार असून याबाबत माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पुणे आणि इतर अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ दिवसांत मुलाखती घेऊन त्यांची भरतीदेखील पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व १०९ उच्च महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.प्राध्यापकांची भरती कशी करायची, यातील मतप्रवाहामुळे २ वर्षे भरती प्रक्रिया लांबली. त्यानंतर आता वित्त विभागाची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर विद्यापीठासह महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महिन्याभरात ही भरती केली जाणार आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील या भरतीबाबत लवकरच अपडेट समोर येईल. विद्यापीठ आणि उच्च महाविद्यालये याबाबत अधिसूचना जाहीर करतील. त्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्णपणे सुरु केली जाईल. ही भरती कशी होणार याबाबतही माहिती देण्यात येईल. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे.















Discussion about this post