नवी दिल्ली । भारतीय रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
नवीन नियम कसा काम करेल?
समजा, एखाद्या प्रवाशाला 15 नोव्हेंबर रोजी प्रवास करण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 वाजता तिकीट बुकिंग करायचे आहे, तर रात्री 12:20 ते 12:35 या 15 मिनिटांच्या वेळेत केवळ आधार-सत्यापित खात्यातूनच तिकीट बुक करता येईल. ज्यांच्याकडे आधार प्रमाणीकरण नाही, त्यांना या महत्त्वपूर्ण 15 मिनिटांच्या कालावधीत बुकिंग करता येणार नाही, कारण याच काळात मागणी सर्वाधिक असते.
सणांच्या आणि लग्नसराईच्या काळात ट्रेनच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सामान्य बुकिंगमध्येही ‘तत्काळ बुकिंग’सारखीच गर्दी होते. या नवीन आधार-आधारित नियमामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन, व्यस्त वेळेतील गैरव्यवहार थांबवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
आयआरसीटीसीनं रेल्वे तिकीट बुकिंग संदर्भात केलेल्या बदलांचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. आयआरसीटीसीनं काही दिवसांपूर्वी तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले होते. तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक करण्यात आलं होतं. आयआरसीटीनं 1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार वेरिफेकशन आवश्यक केलं होतं. आधार वेरिफिकेशन ज्यांनी केलं त्यांनाच तात्काळ तिकीट बुक करता येते. यामुळं तात्काळ तिकीट प्रवाशांना उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता रेल्वेनं आधार वेरिफिकेशनची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतला आहे.















Discussion about this post