मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ दिसून आली. यामुळे दोन्ही धातूंचे दर दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्नच सर्वसामान्यांना पडलेला आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर कमी झाले आहे. प्रति तोळ्यामागे ११० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर गेल्या महिन्याभरापासून १ लाखांपेक्षा जास्त आहेत.मागील आठवड्याभरात सोन्याचे दर सर्वाधिक वाढले आहेत. आज जरी सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरीही ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही आहेत. आज सोन्याचे दर १,११,१७० रुपये प्रति तोळा आहेत.
आजचे सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर १,११,१७० रुपये आहेत. दर ८ग्रॅम सोन्याचे भाव ८८,९३६ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याच्या दरात १,१०० रुपयांची घट झाली आहे. हे दर ११,११,७०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,०१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ८० रुपयांची घसरण होऊन हे दर ८१,५२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरले असून हे दर १०,१९,००० रुपये आहेत.















Discussion about this post