नवी दिल्ली । केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपात अनेक राज्यातील नेत्यांनी पक्षप्रवेश केल्याचं दिसून आले. मात्र आता मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या ४३ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (११ सप्टेंबर) मणिपूरमधील फुंगयार मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या ४३ सदस्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे. या राजीनामा सत्रामुळए नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्याआधी भाजपला मणिपूरमध्ये धक्का बसला आहे.
मणिपूरच्या नागा-बहुल जिल्ह्यातील भाजपच्या फुंगयार मंडळाचा अध्यक्ष, महिला, युवा आणि शेतकरी मोर्चाच्या प्रमुख यांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय मतदारसंघाच्या बूथ अध्यक्षानेही भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीतून राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी निवेदन देखील जारी केले आहे.
‘पक्षातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्ही चिंतित आहोत. तळागळातील नेतृत्वाला सल्लामसलत, समावेशकता आणि आदर न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि पक्षाची विचारसरणीवरील आमची निष्ठा अजूनही कायम आहे. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या व समाजाच्या भल्यासाठी आम्ही नेहमीच काम करत राहू’ असे या सदस्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.















Discussion about this post