सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक गुडन्यूज आहे. नागपूर महानगरपालिकेत विविध गट क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीद्वारे एकूण 174 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, अर्ज शुल्क देखील ऑनलाइनच भरावे लागेल.
या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे.
भरतीमधील रिक्त जागा
नागपूरमधील या भरती मोहिमेत ज्युनिअर क्लर्क पदासाठी ६० जागा रिक्त आहेत. लीगल असिस्टंट पदासाठी ६ जागा, टॅक्स कलेक्टर पदासाठी ७४ जागा,लायब्ररी असिस्टंट पदासाठी ८ जागा रिक्त आहे. स्टेनोग्राफर पदासाठी १० जागा रिक्त आहेत. अकाउंटंट पदासाठी १० जागा रिक्त आहे. सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी १ जागा रिक्त आहे. हॉर्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर पदासाठी जागा रिक्त आहेत.
आवश्यक पात्रता
या भरती मोहिमेत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे.ज्युनिअर क्लर्क पदासाठी पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असाया हवे.वेगवेगळ्या पदानुसार त्या त्या विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबतच कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
उमेदवारांना एनएमसी वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. आरक्षित प्रवर्गासाठी उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.
पगार
ज्युनिअर क्लर्क पदासाठी उमेदवारांना १९,९००-६३,२०० रुपये पगार मिळणार आहे. लीगल असिस्टंट पदासाठी ३८,६००-१,२२,८००रुपये पगार मिळणार आहे. स्टेनोग्राफर पदासाठी ३८,६०० ते १,२२,८०० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post