मुंबई: आता गणेशचतुर्थीला केवळ एक दिवस बाकी आहे आणि सोन्याने उंच भरारी घेतली आहे. आज MCX वर सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसली. सोन्याचा दर 400 रुपयांनी वाढला आहे. मात्र दुसरीकडे चांदी दरात घसरण झाली आहे. आज चांदी दरात १००० रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मात्र सोने महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मागच्या काही दिवसात सोने दरात मोठा बदल दिसून आला. सोनं सतत वाढताना दिसल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता महागाईचा फटका बसला आहे. सणासुदीला सोनं महाग होणं ही एक परंपराच झाल्यासारखी वाटत आहे. उद्या गणरायाचं आगमन होणार असून मात्र त्यापूर्वीच सोन्याचा दर वाढल्याने ग्राहकांना फटका बसला आहे.
आज सोन्याचा दर ४०० रुपयांनी वाढला. यांनतर १० ग्रॅमनुसार २ कॅरेट सोन्याची किमत ही ९३५५० रुपये आहे तर १० ग्रॅमनुसार २४ कॅरेट सोन्याची किमत ही १,०२,०६० रुपये आहे. एक किलो चांदीची किमत ही १,२०,००० रुपये आहे. चांदीची किमत ही १००० रुपयांनी कमी झालेली पाहायला मिळाली.















Discussion about this post