मुंबई । मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टला चलो मुंबई अशी हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटीत सोमवारी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. नाहीतर मुंबईत भगवं वादळ धडकणारच असा इशारा दिला आहे. नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील..
सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. सरकारनं आडमुठी भूमिका सोडावी, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. आरक्षण मिळाल्यास तुम्हाला डोक्यावर घेऊ, असं देखील जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. आमच्या नोंदी सापडल्या तर त्या आम्हाला पाहिजेत, असं मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला ठणकावून सांगितलं.
मुंबईत जाण्याचा मार्ग कसा असेल?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, येत्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मराठा बांधव आंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना होतील. मराठा आंदोलक मंकाळा, शहागड, शहागड चौक, आंबळटाकळी, तुळजापूर, वाघाडी, पैठणहून आपण मुंबईकडे निघतील. त्यानंतर 27 ऑगस्टला शिवनेरी मुक्कामी असणार आहोत. 28 ऑगस्टला सकाळी शिवनेरीचे दर्शन घेऊन राजगुरु खेडमार्गे चाकणला जाऊन तळेगाव लोणावळा पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे आझाद मैदानात सायंकाळी पोहोचू. त्यानंतर 29 ऑगस्टला आपलं बेमुदत उपोषण सुरु होईल.















Discussion about this post