रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेत ऑफिसर होण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने या नवीन भरतीबाबत शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले असून त्यानुसार सेक्शन कंट्रोलर पदांसाठी ही भरती होणार आहे.
या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. तुम्ही www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२५ आहे.
रेल्वे सेक्शन कंट्रोलर या पदांसाठी ३६८ पदे भरती केली जाणार आहे. जर तुम्हाला रेल्वेत ऑफिसर व्हायचं असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.
रेल्वेतील या भरती मोहिमेत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना लेवल ६ नुसार पगार मिळणार आहे.
रेल्वे सेक्शन कंट्रोलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत २०-२३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. विविध ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क द्यायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये शुल्क भरायचे आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.rrbapply.gov.in वर जायचे आहे.
यानंतर Latest Update वर जा. त्यानंतर अप्लायवर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा. यानंतर पासवर्ड टाका.
यानंतर लॉग इन करुन सर्व माहिती भरा.
यानंतर फोटो, सही आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर शेवटी शुल्क भराय आणि फॉर्म डाउनलोड करा.















Discussion about this post