जळगाव । मागील आठवड्यात राज्यात धुमाकूळ घातला होता. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंतच्या भागांत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या तुडुंब भरल्या, तर काही ठिकाणी भूस्खलन व पाणी साचल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. मात्र या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी राज्यात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.
आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, विदर्भ व मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नद्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची आणि शहरातील खालच्या भागांत पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, तर मराठवाड्यात औरंगाबाद व जालना परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये येलो अलर्ट घोषित केला असून शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम व उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे आणि जळगाव येथे हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील. सांगली व सोलापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तर सातारा, कोल्हापूर आणि पुणे घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याठिकाणीही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.















Discussion about this post