काश्मीर । जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला. तर ७० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असून या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना अठोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील चाशोटी येथे गुरुवारी दुपारी मोठ्या संख्येने लोक मचैल माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जमले होते तेव्हा ढगफुटी झाली. मंदिरापर्यंत जाणारी 8.5 किमी लांबीचा पायी मार्ग चाशोटीपासून सुरू होतो. चाशोटी हे किश्तवारपासून सुमारे 90 किमी अंतरावर 9500 फूट उंचीवर आहे. त्या वेळी भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवली. या ठिकाणी पूर आल्यानंतर अनेक यात्रेकरू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अनेक घरे, वाहने, हॉटेल्स वाहून गेल्याचे वृत्त आहे.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांसह लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून अनेक गावे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्वतः रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.















Discussion about this post