नवी दिल्ली । मतदारयादीतील कथित गैरप्रकाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी पुणे कोर्टात दिली.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली.
माझ्या जिवाला धोका – राहुल गांधी
‘२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली.
मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहाता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. हिंदूत्वाचे समर्थन करणारे जहालमतवादी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला लिहिले आहे.















Discussion about this post