जळगाव । जळगावसह राज्यात दडी मारलेल्या पावसाने अक्षरशः घामाघूम केले होते. श्रावणातही ऑक्टोबर हिटचा अनुभव देणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान अशातच नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आजपासून जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्यानं पुढील पाच दिवस राज्यात धो धो पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कमी अंदाज असून जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत पावसाने उघडीप घेतली होती. काही ठिकाणी उन्हाचे चटके जाणवायला लागले होते, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत होता. पण आता पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील पाच दिवस, म्हणजे १८ ऑगस्टपर्यंत राज्यातील १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागाला पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात १४ आणि १५ ऑगस्टपासून पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दि. १६ व १७ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हा पाऊस जिल्ह्यातील पावसाची तूट भरून काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post