जळगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच चोपडा तालुक्यातील अडावद येथील शेतकी शाळेच्यासमोर दुचाकीला भरधाव बोलेरो (एम.एच. १९ सि.एक्स १४९०) वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोन्ही मृत भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील आहे.
अडावदकडून चोपडा शहराच्या दिशेने जाणाऱ्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो गाडीने धडक दिली. बोलेरोचा चालक मनोज संजय पाटील रा. वेले ता. चोपडा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार महेंद्र शांताराम दोडे (क्य ३७) आणि युवराज तुकाराम तायडे (वय ३३) जागीच ठार झाले.
दोन्ही मृत हे भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील रहिवासी आहे. अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयात















Discussion about this post