खालापूर : हवामान खात्याने काल बुधवारी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यात रायगड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. खालापुरातील आदिवासींची वाडीवर दरड कोसळल्याने या दरडीखाली 60 ते 70 जण दबले आहेत. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
दरम्यान, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. या वाडीवर रात्री दरड कोसळली.काल रात्री 10.30 ते 11 वाजता ही दुर्देवी घटना घडली. या गावात 40 घरे आहेत.
ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. त्यामुळे 60 ते 70 जण दरडीखाली दबल्या गेली. ही घटना घडताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.
Discussion about this post