Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धावत्या खासगी लक्झरीला लागली भीषण आग, बसमध्ये होते २५ प्रवासी, जामनेरजवळची भयानक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
धावत्या खासगी लक्झरीला लागली भीषण आग, बसमध्ये होते २५ प्रवासी, जामनेरजवळची भयानक घटना
बातमी शेअर करा..!

जामनेर |: पुण्याहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमधून जवळपास २५ प्रवासी प्रवास करत जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ धावत्या बसचे टायर फुटले. यानंतर क्षणार्धात बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली होती. यावेळी प्रवाशांनी आरोळ्या मारत जीव वाचविण्यासाठी बसमधून उड्या मारल्या होत्या.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ खाजगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. बसमधील प्रवाशांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चालकाने गाडी थांबवली. त्यावेळेस बसचे मागील टायराने पेट घेतलेला होता.यावेळी प्रवाशांनी आरोळ्या मारत जीव वाचविण्यासाठी बसमधून उड्या मारल्या होत्या.

दरम्यान बसमध्ये तब्बल २५ प्रवासी होते. चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करताच प्रवाशांनी खाली उतरले. गाडीतील सर्व प्रवाशांना सामानासह सुखरूप खाली उतरविण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात पूर्ण गाडीने पेट घेतला. यावेळी जोरदार वारा सुरू असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले असता प्रवाशांची धावाधाव केली. काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
महामार्गावरील वाहतूक ठप्प
दरम्यान स्थानिकांनी जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सर्व प्रवासी, चालक वाहक सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान पहूर- जामनेर रोडवर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ; मंत्रिमंडळात घेतले १० महत्वाचे निर्णय

Next Post

तरुणांनो तयारीला लागा ! विधि व न्याय विभागात टंकलेखकांच्या 5 हजार 223 नवीन पदांची निर्मिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

तरुणांनो तयारीला लागा ! विधि व न्याय विभागात टंकलेखकांच्या 5 हजार 223 नवीन पदांची निर्मिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page