नवी दिल्ली । मागच्या काही दिवसात देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. आठवड्याभरात देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले. या कालावधीत ३०५ जणांनी कोरोना संसर्गावर मात केली. चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या सात दिवसांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सात इतकी नोंदली गेली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील चार, केरळमधील दोन आणि कर्नाटकातील एका रुग्णाचा समावेश आहे.
देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १००९
गेल्या एका आठवड्यात (१९ मे नंतर) केरळमध्ये सर्वाधिक ३३५, महाराष्ट्रात १५३, दिल्लीत ९९, गुजरातमध्ये ७६ आणि कर्नाटकात ३४ नवे काेराेना रुग्णांची नाेंद झाली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, साेमवार २६ मे रोजी सकाळी ८:०० वाजता देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १००९ इतकी आहे.
केरळमध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त ४०३ रुग्ण
केंद्र सरकारच्या एजन्सी इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (Insacog) च्या ताज्या आकडेवारीनुसार,केरळमध्ये सर्वाधिक ४०३ कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत २०९ आणि दिल्लीत १०४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या शहरांनंतर गुजरातचा क्रमांक लागतो. येथे ८३ नवे काेराेना रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकात ४७, उत्तर प्रदेशात १५ आणि पश्चिम बंगालमध्ये १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
Discussion about this post