हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने अप्रेंटिसशिप कायदा १९६१ अंतर्गत ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण २०९ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालीय आहे. आणि इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2025 आहे.
रिक्त पदांची माहिती
एकूण २०९ अप्रेंटिस पदांपैकी, मेट (खाणी) च्या ३७, ब्लास्टर (खाणी) च्या ३६, फ्रंट ऑफिस असिस्टंटच्या २०, डिझेल मेकॅनिकच्या ४, फिटरच्या १०, टर्नरच्या ७, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) च्या १०, इलेक्ट्रिशियनच्या ३०, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या ४, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) च्या ४, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) च्या ५, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटच्या ३३, सर्व्हेअरच्या ४, पंप ऑपरेटर कम मेकॅनिकच्या ४ आणि रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनरच्या १ पदासाठी अप्रेंटिसशिप करण्याची संधी दिली जाईल.
आवश्यक पात्रता काय?
मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार मेट (माइन्स), ब्लास्टर (माइन्स) आणि फ्रंट ऑफिस असिस्टंट या पदांसाठी अर्ज करू शकतात. इतर पदांसाठी, ज्यांनी दहावी उत्तीर्ण केले आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केले आहे ते अर्ज करण्यास पात्र आहेत. पदानुसार पात्रतेची माहिती अधिसूचनेतून मिळवा.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया
या अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांची निवड पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकची मदत घ्या.
असे अर्ज करा
विहित पात्रता अटी पूर्ण करणारे उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकारच्या www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
Discussion about this post