बारावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. CISF म्हणजेच केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाकडून हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीबाबत CISF च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. सीआयएसएफमध्ये ३० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (CISF Recruitment 2025)
CISF मधील या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
सीआयएसएफमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला लेव्हल ४ नुसार २५००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना महत्त्वाची माहिती भरायची आहे. त्याचसोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
१२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.















Discussion about this post