कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत पोलिस अधिकाऱ्यावर हात उगारत कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून त्यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे.
खरंतर सिद्धरामय्या भाषण देण्यासाठी उभे राहतात आणि त्याचवेळी गर्दीत उपस्थित असलेल्या भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे देखील दाखवले होते. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले होते. यावेळी ते सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एएसपी नारायण भारमाणी यांच्यावर संतापले. भाषण सुरू करण्यापूर्वी ते एएसपींवर कशाप्रकारे चिडले या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Shameful behaviour by Karnataka CM #Siddaramaiah. How can he insult a police officer like this? He almost slapped him but stopped after noticing the cameras around. #Congress and the arrogance of power walk hand in hand!@siddaramaiah pic.twitter.com/Y6MENnpbdV
— Vineet Vats Tyagi (@vineetvatstyagi) April 28, 2025
संतप्त झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्यायांनी स्टेजवरूनच एएसपीला सांगितले ‘तुम्ही कोणीही असाल, इथे या.’ जेव्हा एएसपी भारमणी स्टेजवर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारले ‘तुम्ही काय करत होता?’ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्यावर हात उगारला आणि त्यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस अधिकारी मागे सरकला त्यामुळे सिद्धरामय्या थांबले. सिद्धरामय्या यांच्या या कृत्यानंतर भाजप आणि जनता दल सेक्युलरसह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.
Discussion about this post