मुंबई : मागच्या काही दिवसापासून सुरु असलेली सोने चांदी दरातील वाढ काही थांबताना दिसत नाहीय. दररोज सोने नवनवीन रेकॉर्ड प्रस्तापित करत आहे. अशात आता सोने 97 हजारांपेक्षा जास्त आहे.
जळगाव सराफा बाजारात सुद्धा सोने जीएसटीसह 97 हजारांच्या घरात पोहचले आहे. तर काहींनी याच महिन्यात सोने एक लाख 30 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची झेप घेईल असा दावा करण्यात येत आहे. तर चांदी सुद्धा मोठी झेप घेण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सोन्याची मोठी मुसंडी
मार्च महिन्यापासून आतापर्यंत सोन्याने मोठी झेप घेतली आहे. या आठवड्यातही सोने सतत वधारत आहे. 16 एप्रिल रोजी 990 रुपये, तर 17 एप्रिल रोजी सोने 1140 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 89,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी पण नाही मागे
मार्च महिन्यापासून चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. भावात पडझड पण दिसून येत आहे. या आठवड्यात चांदीने 200 रुपयांची झेप घेतली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये इतका आहे.















Discussion about this post