10वी पास उमेदवारांना केंद्र सरकारी नोकरीची संधी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) एसएससी एमटीएस, हवालदार भरती परीक्षा 2023 अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांच्या एकूण 1558+ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
भरतीसाठी रिक्त जागा :
1 मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 1198
2 हवालदार (CBIC & CBN) 360
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयोमर्यादा
यातील MTS आणि हवालदारासाठी 18-25 वर्षे (म्हणजे 02-01-1997 पूर्वी आणि 01-01-2004 नंतर जन्मलेले उमेदवार) वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी 18-27 वर्षे (म्हणजे 02-01-1995 पूर्वी आणि 01-01 2004 नंतर जन्मलेले उमेदवार ही वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
Notification Download
Online अर्ज: Apply Online
अर्ज प्रक्रिया शुल्क –
– उमेदवार 100/- रुपयेअर्ज शुल्क रुपये भरू शकतात.
– महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PwD) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक (ESM) यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
महत्वाची माहिती –
– या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
– देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
– अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
– अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
– प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
– प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
– तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
– अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
– अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.