धुळे । धुळ्यामधील शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात महिलेसह तिची सात महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाला लागून बाभळे फाटा आहे. येथे आयशर ट्रक (एमएच १२, यूएम ०५००) भरधाव वेगात निघाला होता. याचवेळी दुचाकी (एमपी ४१, एनई ४०९९) वरून संतोषनाथ बाबूनाथ भाटी (वय २३), पत्नी बबलीबाई (वय २१), मुलगी तनया (वय ७महिने), मेहुणीची मुलगी संजना हे प्रवास करत होते. संतोषनाथ हे धुळ्याच्या दिशेने येताना भरधाव आयशरने त्यांना मागून धडक दिली.
या अपघातात बबलीबाई भाटी व तनया हे दोघे जागीच ठार झाले. तर संजना व संतोष हे जखमी झाले आहे. घटनेबद्दल जखमी संतोषनाथ यांच्या तक्रारीवरून आयशर चालक पोपट आप्पा भाटकर (वय ४५, रा. बारामती, जि.पुणे) याच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post