सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर बँकेत नोकरी मिळविण्यासाठी तुम्हीही इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. या नोकरीबाबत अधिसूचना वेबसाइटवर देण्यात आले आहेत.
स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.पंजाब नॅशनल बँकेत भरती करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी ३५० रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे.
या नोकरीसाठी २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५९ शुल्क मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरु शकतात.
पंजाब नॅशनल बँकेत क्रेडिट ऑफिसर पदासाठी ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे.सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर मॅनेजर पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post