धुळे । धुळ्याच्या शिरपूरमधील हिंगणी गावाजवळ ट्रक आणि पिकअपमध्ये झालेल्या अपघातात एका इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. प्रशांत भगवान घोरपडे असे २० वर्षीय विद्यार्थ्याचा नाव आहे, तर या अपघातामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले. या जखमी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नेमकं काय घडलं?
शिरपूर शहरातील सुभाष कॉलनीमधील आर सी पटेल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी खासगी वाहनाने शिरपूर येथे शाळेत ये जा करतात. तोरखेडा येथून विद्यार्थी घेऊन सदर वाहन शिरपूर शहादा रस्त्याने शिरपूर येथे जात असताना शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकने भरधाव वेगाने जात असताना विद्यार्थी प्रवास करणाऱ्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. त्यात 20 वर्षीय विद्यार्थी प्रशांत घोरपडे याचा जागीच मृत्यू झाला.
वाहनातील 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्या जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ शिरपूर येथे खासगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृत प्रशांत घोरपडे यांचा मृतदेह शहादा येथे रवाना करण्यात आला आहे. प्रशांत घोरपडेच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांतच्या मृत्यूने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत राहत असलेल्या परिसरातही शोककळा पसरली आहे.















Discussion about this post