एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एनटीपीसीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एनटीपीसीमध्ये ntpc.co.in या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. () एनटीपीसीमध्ये ४०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. १ मार्चपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
एनटीपीसीमधील या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७२ पदे रिक्त आहेत. ईडब्लूएस पदासाठी ४० पदे रिक्त आहेत. इतर पदे राखीव प्रवर्गासाठी जागा आहेत. एकूण ४०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षे होती.या नोकरीसाठी राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बी.ई/बी. टेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा अनुभव असायला हवा. (NTPC Job Recruitment)
एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५५,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.
Discussion about this post