जळगाव : अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कारवाई झाली.
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साई मंदिर परिसरात, अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (वय 30, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) हा व्यक्ती अवैध अग्नी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरणगाव पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मंगळवार (दि.18) रोजी घडलेल्या या घटनेत, पोलीसांनी त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे (चार हजार रुपये किमतीचे) जप्त केले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, पोलीस हेड कॉन्सटेबल यासिन सत्तार पिंजारी, प्रेमचंद वसंत सपकाळे, प्रशांत विनायक ठाकुर, ईश्वर तायडे आणि विजय बावस्कर यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post