जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल तापमान हे 35 अंशाच्या वर गेलेले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आता चागलाच उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
आज कसं राहणार तापमान?
18 फेब्रुवारीला राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण असून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.आज जळगावात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 18 फेब्रुवारीला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. इतर शहरांबरोबर आता छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात देखील वाढ होतांना दिसून येत आहे.
नाशिकमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 18 फेब्रुवारीला नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
नागपूरमधील तापमानात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच वाढ झालेली दिसून येत आहे. नागपूरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 18 फेब्रुवारीला नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नागपूरमधील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं वर्तवली आहे.
Discussion about this post