मुंबई । विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला सुरू झालेली गळती थांबवता आलेली नाही. अशातच ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.ते २० तारखेला शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे सांगितले जात आहे. यामुळे महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाला आणखी एका पदाधिकाऱ्याची गळती सहन करावी लागत आहे.
राजीनाम्यापूर्वी उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र
राजीनामा देण्यापूर्वी जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी, “साहेब, मला माफ करा” असे म्हटले आहे. हा राजकीय निर्णय घेताना त्यांच्यावर मोठा ताण असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
ठाकरे गटाला सुरू असलेले धक्के
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. पुण्यातील काही नगरसेवकांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला. शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. ही सुरू असलेली गळती उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी मोठे आव्हान बनली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही परिस्थिती अधिक कठीण बनली आहे.
Discussion about this post