जळगाव l जळगाव विमानतळावरून उडान योजनेंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद, तसेच मुंबई व अहमदाबाद विमानसेवा नियमित सुरू आहे.गेल्या एक-दोन महिन्यांपासून विमान ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती विमान कंपनीकडून दिली जात नसल्याने प्रवाशांची ऐनवेळी विमानतळावर तारांबळ उडत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जळगाव-पुणे या आठवडाभर असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करून ते आता चार दिवस करण्यात आले आहे. विमान ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वेळेवर माहिती दिली जात नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
Discussion about this post