कर्मचारी राज्य विमा निगममध्ये भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्हाला esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.ईएसआयसीमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे. २०० रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
ईएसआयसी फरीदाबादने मेडिकल विभागात स्पेशलिस्ट, सिनियर रेजिडेंट, सुपर स्पेशलिस्ट, टिचिंग फॅकल्टी, विजिटिंग फॅकल्टी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ()
स्पेशलिस्ट पदासाठी ४ जागा रिक्त आहे. पॅनलमेंट, सुपर स्पेशलिस्ट पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. टिचिंग फॅकल्टीमध्ये ९ जागा रिक्त आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी २१ जागा रिक्त आहे. सहायक प्रोफेसर पदासाठी ३१ जागा रिक्त आहेत. सिनियर रेजिडेंट पदासाठी १२१ रिक्त जागा आहेत.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, एज्युकेशल सर्टिफिकेट, अनुभवाचे सर्टिफिकेट हे कागदपत्र असणे गरजेचे आहे. (ESIC Recruitment 2025)
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची योग्यता आणि मेडिकल फिल्डमधील अनुभव याद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग केले जाते. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.















Discussion about this post