Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या हस्ते ‘एक रेशन कार्ड एक साडी’ योजनेचा शुभारंभ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या हस्ते ‘एक रेशन कार्ड एक साडी’ योजनेचा शुभारंभ
बातमी शेअर करा..!

जळगाव । कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी संपन्न झाला.

याप्रसंगी तालुक्यातील 10 अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलाना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साडी वितरण करण्यात आले. या योजने अंतर्गत राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न होत असून लाडक्या बहिणींना साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे कापूस संबंधी प्रक्रिया उद्योग या संबंधित विभागाचे मंत्रीपद हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे असल्याने जळगाव व भुसावळ येथे संबंधित उद्योगाच्या वाढीस नक्कीच चालना मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी उपस्थिताना कॅप्टीव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री खाजगी सचिव प्रल्हाद रोडे, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , भुसावळ तहसीलदार नीता लबडे ई मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती बडगुजर यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला, परितक्ता महिला यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांचे हस्ते ई- शिधापत्रिकांची वितरण करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडियन ऑइलमध्ये 382 पदांसाठी निघाली भरती; कोण अर्ज करू शकतो? पहा..

Next Post

CBSE कडून बंपर रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता?

CBSE कडून बंपर रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page