जळगाव । एकीकडे देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार अजूनही सुरूच असून या दरम्यान सोन्याच्या किमतीने नवीन आस्मान गाठले आहे. भारतातील सोन्याच्या किमतींनी नवीन विक्रमी पातळी गाठली असून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने किंमती रोज रेकॉर्डवर रेकॉड करत आहे.
आता सोने खरेदी करणं फार कठीण झाले आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ७९,६५० रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात या आठवड्यात सातत्याने वाढ दिसून आली. शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रती तोळ्यामागे पुन्हा २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ८०७०० रुपयांवर (जीएसटीसह ८३१२०) पोहचले. सोन्याचा हा दर आजवरचा सर्वाधिक उच्चांकी दर आहे.चांदीचा एक किलोचा भाव ९३००० रुपये प्रति किलो इतका आहे.
जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली. दुसऱ्या दिवशी अनुक्रमे १०० रुपयांची वाढ झाली. तर बुधवारी ७०० रुपयांनी सोने वाढून सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहचले. गुरुवारी १०० रुपयांनी सोने दूर खाली आले.















Discussion about this post