विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
४ मे रोजी आधी ही परीक्षा होणार होती. सेट परीक्षा आता जून महिन्यात 15 तारखेला आयोजित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
विद्यापीठाच्या सेट विभागाने आतापर्यंत 39 सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ओएमआर शीट द्वारे घेतल्या आहेत. चाळीसावी सेट परीक्षा सुद्धा ऑफलाइन पद्धतीने जाणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेत बदल केला असला तरी परीक्षेच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; याची विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post