सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशातच एका एसटी चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एसटी केबिनमध्ये चढण्यासाठी टप्पे बनवले गेले आहेत, पण गाडीचा दरवाजा एका बाजूला आणि चढण्यासाठीचे टप्पे दुसऱ्या बाजूला असल्यामुळे, एसटी चालकाने व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न विचारला, “आता मी गाडीत चढू कसा?”
अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही .
परिवहन मंत्री कोणी असेल त्याला या बस मध्ये चढायला लावा .
सुधारा रे मंद बैलांनो 😂
माझा दादा चढेल कसा आणी कुठून 😡😡. pic.twitter.com/2f4wFdI57z— Shekhar P (@Godfath52464383) January 13, 2025
एसटी ड्रायव्हरने एक गमतीशीर व्हिडीओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडली आहे, ज्यामुळे अनेकांना डोक्यावर हात मारायला लागले. व्हिडीओमध्ये एसटी चालक हसत हसत सांगत आहे की, पायरी एका बाजूला आणि दरवाजा दुसऱ्या बाजूला बसवले आहेत. त्याने मजेशीर पद्धतीने प्रश्न विचारला, “आता या पायरीवरून गाडीत कसा चढू?” जरी चालकाने हसतमुखाने यावर सवाल केला असला तरी, एसटी महामंडळाला या प्रकारावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. ड्रायव्हरने उठवलेला मुद्दा एसटी गाड्यांच्या डिझाइनमुळे प्रवाशांना होणाऱ्या समस्यांचा दर्शक आहे.
हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर “Shekhar p” या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंतहजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, आणि ५०० पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडीओ हळूहळू मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर एका यूजरने कमेंट केली आहे, “बस गमतीशीर बनवली आहे.. उगाच ड्रायव्हरला दोष देवून काय फायदा?” या कमेंटने लोकांच्या आणखी विविध प्रतिक्रिया उमटत आहे.















Discussion about this post