भोपाळ । मध्यप्रदेशच्या सागरमध्ये भाजपचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. या छाप्यादरम्यान आयकर विभागाने दीडशे कोटी रुपये जप्त केले. त्याचसोबतच राठोड यांच्या घरातल्या तलावात तीन मगरी देखील सापडल्या. ते आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. ही माहिती आयकर विभागाने वन विभागाला दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय माजी नगरसेविक आणि बांधकाम व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्या घरीदेखील ईडीने रेड मारली. राजेश केशरवानी यांच्या घरीत पार्क असलेल्या सात महागड्या गाड्या आयकर विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. छाप्यामध्ये २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये १४ किलो सोनं सापडले, ते सुद्धा ईडीने जप्त केले आहे.
राठोर कुटुंब आणि केशरवानी कुटुंब एका फर्ममध्ये व्यावसायिक भागीदार आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध देखील आहेत. दोन्ही कुटुंबातील अनेकजण राजकारणात सक्रिय आहेत. ईडीच्या छाप्यामध्ये केशरवानी कुटुंबाकडे १४० कोटी काळा पैसा असल्याचे समोर आले. तर राठोड कुटुंबाकडूनही २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त काळे धन प्राप्त झाले. या कारवाईला दोन दिवस लागले असल्याची माहिती समोर आली आहे.
Discussion about this post