जळगाव । महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार देखील झाल्यांनतर खातेवाटप झाले. मात्र, अजून पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली नाही.पालकमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, याची जास्त चर्चा रंगली आहे.
खरंतर जळगाव जिल्ह्यातील अकरावी विधानसभा क्षेत्रांपैकी पाचवी विधानसभा क्षेत्रांवर शिवसेना तर पाच विधानसभा क्षेत्रांवर भाजप असे आमदार विराजमान झालेले आहेत. राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होऊन महिन्याच्या वर कालावधी उलटलेला आहे. परंतु, कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री पद जाहीर करण्यात आलेले नाही. सत्ता स्थापना झाल्यापासून कोणाला किती जागा मिळणार? कोण कॅबिनेटमध्ये असणार व त्यांना कोणती खाते द्यावी यावरून बराच कालावधी विचार विनमयात वेळे गेलेला आहे.
जळगाव जिल्हा मध्ये महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्ह्यात आहे. ते पुन्हा मंत्री होऊ न शकल्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या रोषामधून ते बाहेर पडलेले नाहीत. जळगाव जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदी राज्याचे व भाजपाचे संकट मोचक यांना रस नसल्याने त्यांनी पूर्वीच आपण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदी इच्छुक नसल्याचे जाहीर केलेले आहे. असे असताना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील हे असताना भाजपचे दुसरे कॅबिनेट मंत्री भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचे नाव पुढे येऊ लागले आहे.
त्यामुळे भाजपा पुन्हा जळगाव जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी इच्छुक आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपचा झेंडा लावावा यासाठी पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये इच्छुक असून दुसरीकडे गुलाबराव पाटील हे पुन्हा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रेस मध्ये आहेत. जळगाव जिल्ह्याच्या रावेर लोकसभेमध्ये भाजपाचे वजन मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री रावेर लोकसभेमध्येच आहे. त्यामुळे सत्ता केंद्र हे रावेर लोकसभा बनणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.















Discussion about this post