जळगाव । जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली. तसे आदेश सोमवारी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांची नियंत्रण कक्षाचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी संजय गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे.
सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश गायकवाड यांची एरंडोल येथे तर एरंडोलचे प्रभारी सतीश गोराडे यांची सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली. गोराडे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात दाखल पाईप चोरीच्या गुन्ह्यामध्ये रिमांड रिपोर्टमध्ये मुख्य संशयिताचे नाक चुकणे, नंतर त्यात खाडाखोड करणे अन्य कारणांवरून पोलिस निरीक्षकांच्या बदलीच्या हालचाली सुरू होत्या















Discussion about this post