मुंबई । महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संबंधित माहिती दिली आहे.
कोणत्या भागात पाऊस पडणार?
महाराष्ट्रातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. 25 ते 29 डिसेंबर दरम्यान या भागात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.
थंडी ओसरली
उत्तर भारतातील थंडीची लाट हळूहळू कमी होत आहे आणि महाराष्ट्रातही थंडी ओसरत आहे. या बदलामुळे नाताळाच्या दिवसात थंडी अनुभवता येणार नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. IMD च्या माहितीनुसार, पावसाची शक्यता 26 ते 28 डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत अधिक आहे.
Discussion about this post