सध्या लग्नाची धामधूम सुरु असून याकाळात सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र अलीकडेच सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले. दरम्यान मागील काही दिवसापासून सोने दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसत आहे. या आठवड्यात गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचा भाव वाढला होता. मात्र आज सोनं स्वस्त झालं असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली.Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १९ डिसेंबर रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,72,800 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,085 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,680 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,850 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,72,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,280 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,824 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,728 रुपयांनी विकलं जात आहे.















Discussion about this post