माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत भाजपसह निवडणूक आयोगाचीही खरडपट्टी काढली.शरद पवार यांनी पहिल्यांदाच ही शंका उपस्थित केली आहे.
ईव्हीएम मशीन हॅक होते का याचा माझ्या हातात पुरावा नाही. निवडणुकीपूर्वी काही लोकांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. या पद्धतीने मशीन हॅक करणं शक्य असल्याचं म्हटलं होतं. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ही आमची कमतरता होती. निवडणूक आयोग इतकी टोकाची चुकीची भूमिका घेईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. या संस्थेवर आम्ही गैरविश्वास ठेवला नाही. पण निवडणुकीत यात तथ्य आहे, असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडी आंदोलन करणार
फेरमतमोजणीत काय येतं ते पाहू. यातून काही फार पुढे येईल अशी शंका वाटते. मतदानाच्या शेवटच्या 2 तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे. बाळासाहेब थोरातांसह अनेकांनी अशी माहिती समोर आणली आहे. पुराव्यासह दिली आहे. त्याचा विचार करावा लागेल. काँग्रेस कार्यकारिणीची काल बैठक झाली. त्यात हा विषय झाला. इंडिया आघाडीने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवार किंवा मंगळवारी ही चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Discussion about this post