संभाजी नगर । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या असून आता उद्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे. मात्र त्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यामध्ये मतदारांना पैसे वाटून बोटाला शाई लावल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी यावरुन आरोप करत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात केले आहेत.
यावरुन छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीवेळ चांगलाच गोंधळ झाल्याचं समजतंय. तसंच पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जमा करुन 2 कोटी सोडून दिलेत असं म्हणत संजय शिरसाट यांनी फोन केल्याचा आरोप केला आहे.















Discussion about this post