मुंबई । एकीकडे महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना गुजरातवरून मीरा रोडला आलेल्या तरुणाकडे 51 लाख 70 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या नोटा कुठे छापल्या आणि कुठे वितरित केल्या जाणार होत्या, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. काळ्या पैशांच्या देवाण-घेवाणीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यातच काशिमिरा येथे एक तरुण बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉन बॉस्को शाळेजवळ असलेल्या मुन्शी कंपाउंड येथे सापळा लावून आर्यन जाबूचा (१९) या तरुणाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या बॅगेत ५३ नोटांची बंडले आढळली. त्या एकूण ५१ लाख ७१ हजारांच्या नोटा आढळून आल्या. हा तरुण मूळ गुजरात राज्यातील भावनगर येथे राहणारा आहे. त्याने या बनावट नोटा कुठून आणल्या आणि कुणाला वितरित करणार होत्या याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी दिली.















Discussion about this post