सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओएनजीसीने तब्बल २२३६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
करिअरची सुरुवात करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करा.या अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने अर्ज NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
पात्रता काय?
या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी १०वी/१२वी / ITI/ डिप्लोमा / बीएससी / बीई / बीटेक / बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
या अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.















Discussion about this post