मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस सातत्याने नाकाबंदी करत आहेत. याच दरम्यान, पोलिसांनी मुंबईत नाकाबंदी करून सुमारे सहा टन चांदीच्या विटा जप्त केल्या. यासोबतच अनेक रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
राज्यात आतापर्यंत अनेक कोटींची रोकड, सोने आणि चांदी जप्त केली आहे. यातच विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एक कॅश व्हॅन अडवून तपासणी केली असता सर्वांना धक्का बसला. कारण कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या, ज्या साडे सहा टन वजनाच्या आहेत. त्यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास 60 कोटींच्या घरात आहे.
चांदीच्या विटा ब्रिंक्स कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी जात होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.















Discussion about this post