भारत डायनामिक्स लिमिटेड भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले जात आहे. ट्रेड अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. नोकरीसाठी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी करिअरची सुरुवात करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
भारत डायनामिक्स लिमिटेड ही मिनी रत्न कंपनी आहे.या कंपनीत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमधून आयटी सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावी. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
भारत डायनामिक्स लिमिटेडमधील नोकरीसाठी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परिक्षेशिवाय करता येणार आहे. मेरिट बेसवर तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, जन्मदाखला, दहावी पास प्रमाणपत्र ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. ()
रेल्वेत नोकरी
सध्या दक्षिण पश्चिम रेल्वेत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पोर्ट्स कोटाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. ४६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहेत.















Discussion about this post