मुंबई । रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर आता महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली आहे.
विरोधाकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगसह अनेक गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या आरोपाची दखल घेत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली. रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली केल्यानंतर राज्याच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन जणांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्यामधील संजय वर्मा यांची निवड केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. ते लवकरच पदभार स्वीकारतील. संजय वर्मा १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते डीजी म्हणून कार्यरत आहेत. एप्रील २०२८ मध्ये ते निवृत्त होऊ शकतात.