यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका बसला होता. अनेकांना ट्रम्पेट आणि तुतारी यांच्यातील फरक समजला नसल्याने मोठा घोळ झाला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्ष चिन्हासंदर्भात मोठा दिलासा दिलाय. यापुढे ट्रम्पेटला तुतारी असं भाषांत्तर करता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय.
खरंतर इंग्रजी वाद्य ट्रम्पेट आणि मराठी वाद्य तुतारी यांच्यात फरक असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सांगितलं होतं. त्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. ट्रम्पेटचं भाषांत्तर हे तुतारी करून अशी विनंती शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या विनंती आयोगाकडून मान्य करत ट्रम्पेटचं भाषांत्तर तुतारी करून अशी सुचना आयोगाने दिलीय.